मुतखड्याचा आजार हा बहुतांश लोकांनमध्ये दिसून येणारा किडनीचा एक महत्वपूर्ण रोग आहे. मुतखड्यामुळे अ…
मुतखड्याचा आजार हा बहुतांश लोकांनमध्ये दिसून येणारा किडनीचा एक महत्वपूर्ण रोग आहे. मुतखड्यामुळे असह्य वेदना , लघवीत संसर्ग आणि किडनीचे नुकसान होऊ शकते.त्यामुळेच मूतखड्याबद्दल तसेच तो थांबवण्यात उपाय जाणून घेणे गरजेचे आहे.
मुतखडा म्हणजे काय? लघवीत कँल्शीयम औक्झलेट किंवा इतर क्षारकण एकमेकांच्यात मिसळल्यानंतर काही काळानंतर हळूहळू मुत्रमार्गात कठीण पदार्थ तयार व्हायला लागतात,त्यालाच मुतखडा असे म्हणतात.
मुतखडा किती मोठा असतो, कसा दिसतो, तो मुत्रमार्गात कुठे दिसू शकतो? मुत्रमार्गात होणारा मुतखडा वेगवेगळ्या लांबीचा आणि वेगवेगळ्या आकाराचा असतो. हा रेतीच्या कणाएवढा छोटा किंवा अंडाकार आणि बाहेरून नरम असतात अशा प्रकारच्या खड्यांमुळे कमी वेदना होतात आणि ते सहजपणे नैसर्गिकरित्या लघवीबरोबर बाहेर पडून जातात.
काही खडे ओबडधोबड असतात, ज्यामुळे खूप वेदना होतात आणि ते सहजपणे लघवीबरोबर बाहेर पडत नाही .मुतखडा सामान्यतः किडणी,मुत्रवाहिनी आणि मुत्राशायात दिसून येतो.
काही व्यक्तींत विशेष करून मुतखडा का दिसून येतो? मुतखडा होण्याची मुख्य कारणे कोणती? साधारणतः आपल्या लघवीत असलेले काही खास रासायनिक पदार्थ, क्षारकण एकमेकांत मिसळण्यास रोखतात, त्यामुळे मुतखडा बनत नाही.
मात्र अनेक जणांमध्ये पुढील कारणांमुळे मुतखडा तयार होण्याची शक्यता असते पाणी कमी पिण्याची सवय अनुवंशिकतेमुळे मुतखडा होण्याची शक्यता . मुत्रमार्गात वारंवार संसर्ग होणे मूत्रमार्गात अडथळा असणे व्हीटँमीन सी किंवा कँल्शीयम असलेल्या औषधांचे अधिक सेवन करणे. दीर्घकाळ अंथरूणावर पडून राहाणे हायपरपँराथायरॉईडीझमचा त्रास असणे. मुतखड्याची लक्षणे सर्वसामान्यपणे मुतखड्याचा आजार ३० ते ४० वर्ष वयोगटात आणि महिलांच्या तुलनेत पुरुषांच्यात ३ ते ४ टक्के अधिक